बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा !
बेंगळुरू – हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हिंंदुत्वाचे रक्षण हे उद्देश समोर ठेवून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील श्री लक्ष्मीनारायण सभा भवनामध्ये १६ ऑक्टोबरला हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. हिंदु समाजाने धर्मशिक्षण घेऊन धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे उद्गार सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव यांनी या वेळी बोलतांना काढले. समाज सेवक श्री. व्यंकटस्वामी रेड्डी, रणरागिणीच्या कु. भव्या गौडा आणि हिंंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – भव्या गौडा
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – भव्या गौडा
आज जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि गुंडगिरी यांनी समाज पोखरला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाज आणि राष्ट्र यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे स्वसंरक्षणाबरोबरच समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. मुलींमध्ये आत्मबळ वृद्धींगत करण्यासाठी आणि समाजातील अश्लीलतेच्या विरोधात लढा देण्यासाठी रणरागिणीच्या वतीने कन्या शौर्य अभियान राबवण्यात येत आहेे.
समाजातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे ! – व्यंकटस्वामी रेड्डी
भ्रष्टाचारामुळे समाज पूर्णपणे पोखरला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
हिंदु राष्ट्र हाच सर्व समस्यांवरील एकमेव तोडगा आहे – विजय रेवणकर
आतंकवाद, धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदु नेत्यांच्या हत्या, धर्मावरील संकटे आणि भ्रष्टाचार यांमुळे देशाची अधोगती झाली आहे. या सर्व समस्यांना निधर्मी लोकशाही उत्तरदायी आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समस्यांवरील एकमेव तोडगा आहे.
via Blogger http://ift.tt/2dtSS9Y
from WordPress http://ift.tt/2epuJTu
via IFTTT
No comments:
Post a Comment