Latest News

जुन्याच नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस- राष्ट्रवादी जाणार बैकफुटवर ?

न.प. मधील सद्याच्या बेजबाबदारपणाच्या कामाचा बसणार फटका !
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
ऐन दिवाळीच्या धामधुमीत नगरपरिषद निवडणुकांची आतषबाजी सुरु झाली आहे. अपेक्षेपेक्षा आठ दिवस अगोदर आलेल्या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय पक्षांपुढे उमेदवारीचा गुंता निर्माण झाला आहे. पक्ष एक, इच्छूक अनेक, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकीनऊ येत आहे. शहरातील सद्याच्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी  कारकीर्दीतला ढिसाळ कारभार पाहता पुन्हा जुन्याच नगरसेवकांना टिकीटे दिल्यास कॉंग्रेस या निवडणुकीत बैकफुटवर जाण्याचे संकेत दिसत आहे.

दिर्घ प्रतिक्षेनंतर काही दिवसांपुर्वी शहरातील नगरपरीषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ऐन दिवाळीतच निवडणुकांचा नगारा वाजला आहे.  नगरसेवकांसाठी सर्व पक्षाकडे उमेदवारांची रिघ लागल्याचे दिसत आहे. या ठिकाणी पक्षांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. यात एकाची निवड केल्यानंतर इतरांचीही नाराजी मतदारावर परिणामकारक ठरु शकते. अशा स्थितीत लोकप्रियतेसोबत आरक्षणातील उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र आणि तत्सम कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सद्या नगरपरीषदमध्ये कॉंग्रेसची सत्ता असतांना संपुर्ण कामातील बेजबाबदारपणा जनतेसमोर आला आहे. भरभक्कम अनुभवी नेतेमंडळी त्यांच्याकडे असतांनासुध्दा कित्येक सभा कोरमअभावी रद्द झाल्या आहे. त्यामुळे शहरवासीयांत त्यांच्याबद्दल प्रचंड चिड आहे. यामधीलच काही नगरसेवकांनी पुन्हा उमेदवारी अर्ज पक्षाकडे केल्याचे समजते. शहरवासीयांत चिढ असलेल्या उमेदवारास पुन्हा उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस- राष्ट्रवादी बैकफुटवर जाण्याचे संकेत दिसत आहे. त्यामुळे युवा नवीन चेहरा शोधण्यात पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

via Blogger http://ift.tt/2excddy




from WordPress http://ift.tt/2euD9O7
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.