नालासोपारा येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
मुंबई जिल्हाधिकारी श्री. कुशवाहा यांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
यामध्ये मुंबई जिल्हाधिकारी श्री. दीपेंद्रसिंग कुशवाहा यांना, तसेच वरळी, दादर, शिवाजी पार्क, माहीम, भायखळा, अंधेरी, जोगेश्वरी, नालासोपारा, विरार येथील पोलीस ठाण्यांत निवेदने देण्यात आली. मुलुंडचे तहसीदार डॉ. संदीप माने, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंड येथील पोलीस ठाण्यांमध्येही निवेदने देण्यात आली.
बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना निवेदने !
नवी मुंबई येथील बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली. या वेळी सर्व दुकानदारांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले अन् चिनी फटाक्यांची विक्री करत नसल्याचे सांगितले, तर काहींनी अशा प्रकारे फटाक्यांची विक्री करणे योग्य नसल्याचे सांगून समिती करत असलेले कार्य योग्य असल्याचे म्हटले. समितीच्या वतीने सौ. तनुजा यादव, सौ. मंगल खोत, सौ. रेखा सावरकर यांनी ही निवेदने दिली.
via Blogger http://ift.tt/2emQBhV
from WordPress http://ift.tt/2dZaBGx
via IFTTT
No comments:
Post a Comment