Latest News

उपराजधानीत मराठा क्रांती मोर्चा संपन्न – ड्रोनला परवानगी नाकारली #MarathaKrantiMorcha

नागपुर:/–#MarathaKrantiMorcha
आज नागपूर येथे सकल मराठा समाजातर्फे विशाल अशा मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोर्चात माजी खासदार जांबवंतराव धोटे व इतरही  राजकारणी सहभागी झाले होते सदर मोर्चा आज ठीक १२ वाजता रेशीमबाग मैदानातून निघाला शहरातून अनेक भागातून फिरून हा मोर्चा कस्तुरबाचंद मैदानात येऊन समाप्ती झाली  आजच्या मोर्चाला सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु होतो त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. जिथे संपतो त्या ठिकाणी विधानभवन असल्याने ड्रोनला परवानगी नाकारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या डेडलाईनच्या आधीचा हा शेवटचा मोर्चा आहे.
मागण्या मान्य न केल्यास यानंतर थेट हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा आयोजकांनी दिला आहे.  यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, केडीके डेंटल कॉलेज आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा ही समवेश होता 

via Blogger http://ift.tt/2eAD4qC




from WordPress http://ift.tt/2e6D2TX
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.