Latest News

प्रत्येक भारतियाने राष्ट्रवाद जपला पाहिजे ! – दीप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

नालासोपारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात 
पाक कलाकारांच्या चित्रपट प्रदर्शनाला राष्ट्रप्रेमी नागरिकांचा विरोध


आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्र आणि धर्म प्रेमी
      नालासोपारा- पाकच्या आतंकवादी कारवायांचा साधा निषेधही न नोंदवणार्‍या पाक कलाकारांचे चित्रपट या देशात प्रदर्शित होऊ न देणे हा राष्ट्रवाद आहे. हा राष्ट्रवाद प्रत्येक भारतियाने जोपासायला हवा, असे आवाहन हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी नालासोपारा येथील संतोष भुवन येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. पाक कलाकारांच्या चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासह मुंबई येथे १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६ रहित करणे, शिवछत्रपतींचा वारसा असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करण्यात यावे, सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी करणार्‍या प्रदूषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदी घालावी या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या. या आंदोलनात हिंदु गोवंश रक्षा समिती, हिंदु जनजागृती समिती, बजरंग सेवा दल, मनसे, शिवसेना, भाजप, सनातन संस्था, बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आदी संघटनांचे ८० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पाकिस्तानी कलाकारांना भारतात प्रतिबंध करावा ! – डॉ. सुजित यादव
      पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात अन् स्वदेशी जाऊन मात्र भारताच्या विरोधात गरळओक करतात. या उलट भारतीय चित्रपट आणि कलाकार यांना मात्र पाकिस्तानात बंदी आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात प्रतिबंध करायला हवा.
राष्ट्र संकटात असतांना फटाके फोडून दिवाळी साजरी करणे भारतियांसाठी लज्जास्पद ! 
– सौ. लक्ष्मी राऊत, सनातन संस्था
     आज देशावर आतंकवादी आक्रमणे, स्त्रियांवरील अत्याचार, आर्थिक संकट असतांना सहस्रो रुपयांचे फटाके फोडून दिवाळी साजरी करणे हे भारतियांना लज्जास्पद आहे. त्यामुळे येणार्‍या दिवाळीत फटाके न फोडता राष्ट्र आणि धर्म यांप्रती जागरूक रहावे.
प्रत्येक नागरिकाने राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे ! – सूर्यभान सिंग, बजरंग सेवादल
     प्रत्येकाने निश्‍चय करून राष्ट्र-धर्म यांच्याप्रती जागरूक राहिल्यास व्यापक पालट होईल. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रकार्यात सहभागी झाले पाहिजे.
शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करावे ! – प्रसाद काळे, हिंदु जनजागृती समिती
     खाजगी जागेतील गडकोटांची स्थिती दयनीय आहे. भिवंडीतील एका किल्ल्यावर शौचालय बांधले आहे. शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांची खाजगी मालकांकडून मुक्तता करून शासनाने त्यांचे संवर्धन करावे.
       या वेळी समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.

via Blogger http://ift.tt/2dYsqsh




from WordPress http://ift.tt/2dYwQjd
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.