मुंबई /—-
विधानसभा २0१४ च्या निवडणुकीत सुरेखाताई ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यावेळी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या युती संदर्भात बोलणी सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षांची उमेदवारी मिळणार नसल्याची ठाकरे यांना शक्यता असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला सोबत होऊन अचलपूर विधानसभा मतदारसंघाची खिंड लढविली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी देऊन मोठे धाडस दाखविली होते. पण, मतदारसंघात दिग्गजांच्या स्पध्रेतही ठाकरेताईचा ठराव लागू शकला नसल्याने त्यांना चारही मुंड्या चित व्हावे लागले होते. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुकाच्या वारे वाहत असताना मागील काही महिन्यापासून ठाकरे या पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू होती. मात्र, मुहूर्ताअभावी प्रवेश रखडला असल्याची बोलले जात होते. बुधवारी सुरेखा ठाकरे यांच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त मिळाला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रमेश बंग, अनिल देशमुख, वसंत घुईखेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रवेश घेतला.
त्यावेळी जि.प.चे संतोष महात्मे, अरुण गावंडे, प्रवीण भुजाडे, राजू बर्वे, दिलीप धोटे, राजेश ठाकरे, रमाकांत शेरेकर, विलास कुचे, प्रशांत ठाकरे ,अजित पटेल, आदी उपस्थितीत होते. सुरेखा ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने पक्षांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाली असून आगामी होणार्या जि.प., नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे.
via Blogger http://ift.tt/2ecNKrK
from WordPress http://ift.tt/2dMlsDp
via IFTTT
No comments:
Post a Comment