Latest News

नगराध्यक्षपदासाठी १५ नामांकन तर नगरसेवकपदासाठी ११० नामांकन दाखल – चांदुर रेल्वे नगरपरीषद निवडणुक रणधुमाळी

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)


चांदुर रेल्वे नगरपरीषदेची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच घोषीत करण्यात आली. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरीषद अध्यक्षपदासाठी थेट निवडणुक व नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रीया २४ ऑक्टोबरपासुन सुरूवात होऊन शनिवारी ही प्रक्रीया संपली. या सहा दिवसांत नगराध्यक्षपदासाठी १३ उमेदवारांनी १५ नामांकन अर्ज व नगरसेवक पदासाठी ११० उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे.
             चांदुर रेल्वे नगरपरीषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची निवडणुक होणार असुन या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, तिसरी आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय रीपब्लीकन पक्ष तसेच अपक्षांनी सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये कॉंग्रेसतर्फे निलेश सुर्यवंशी व प्रफुल्ल कोकाटे, भारतीय जनता पक्षातर्फे प्रमोद नागमोते व सचिन जयस्वाल, तिसऱ्या आघाडीकडुन नितीन गवळी, शिवसेनेतर्फे स्वप्निल मानकर, राष्ट्रवादीतर्फे गणेश रॉय, भारीपकडुन चेतन भोले, तर अपक्ष म्हणुन विनय कडु, निलेश विश्वकर्मा, नंदकिशोर खेरडे, हेमंत हटवार, निरंजन शहा सैफुल्लाह शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर नगरसेवक पदासाठी ८ प्रभागातुन १७ जागांसाठी ११० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुक आयोगाने ऑनलाईन नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू केली होती. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. परंतु शनिवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया ऑफलाईन केल्यामुळे व नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महिला व पुरूषांची गर्दी पहायवयास मिळाली.

via Blogger http://ift.tt/2f2yQo5




from WordPress http://ift.tt/2f2FkDg
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.