नवी मुंबईत मराठी राजभाषा दिन साजरा
सानपाडा – हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीचे थोर पुरस्कर्ते आहेत, असे प्रतिपादन मराठी राजभाषा दिनानिमित्त डॉ. उदय धुरी यांनी केले. येथील एका नामांकित महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात राजभाषादिन साजरा करण्याची अनुमती मागूनही शिक्षकांनी ती नाकारली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले. श्री. अक्षय काळे या विद्यार्थ्याने पुढाकार घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा आखली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्रसेना, हिंदु जनजागृती समिती अशा संघटनांनीही त्यात सहभाग घेतला. शिवस्मारकापासून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. भगवा ध्वज फडकवत धावती फेरी काढत बेलापूर किल्ल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. भग्नावस्थेत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडे शासनाचे लक्ष जावे आणि त्याची योग्य ती काळजी घ्यावी, हा त्यामागील उद्देश होतात.
हिंदू महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे यांनी ध्वजारोहण केले, तर नवी मुंबई मंदिर समितीचे श्री. लालचंद भोईर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. हिंदुत्वनिष्ठ श्री. आशु दळवी यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
via Blogger http://ift.tt/2m1BMWR
from WordPress http://ift.tt/2mgfjYk
via IFTTT
No comments:
Post a Comment