Latest News

“आजचा युवक सळसळत्या रक्ताचा, शाबुत डोक्याचा” -डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन

वरुड (अमरावती) :- 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना संधी प्राप्त करून दिली आहे. याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेत आपल्या देशाचे नावलौकिक करावे. आजचा युवक हा सळसळत्या रक्ताचा व शाबुत डोक्याचा असल्याचे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी युवक-युवती भव्य रोजगार मेळावाच्या कार्यक्रम प्रसंगीअध्यक्षीय भाषणातून बोलतांना व्यक्त केले.
     यावेळी जिल्हा कौशल्य विकास स्वयंरोजगार अमरावती सहाय्यक संचालक अशोक पाईकवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या डॉ.क्रांतीताई काटोले, सौ. सविता अब्रुक, स्पीक इजी अमरावतीचे संचालक प्रा.शिवाजी कुचे, कॅलीबर ग्रुप मुंबई-गुजरातचे संचालक प्रा.अजयजी भालेराव, आय.ए.एस.मिशन संचालक डॉ.नरेशचंद्र काठोळे तसेच मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणी मर्या.मोर्शीच्या अध्यक्षा सौ.वसुधाताई बोंडे, शेघाट नगराध्यक्ष रुपेश मांडवे, वरुड ठाणेदार गौरख दिवे, आयटीआयचे  प्राचार्य तुमराम, मोर्शी पंचायत समिती सभापती शंकर उईके, उपसभापती सुनील कडू, सदस्य यादवराव चोपडे, जि.प.सदस्य अनिल डबरासे, प्रा.संजय घुलक्षे, पं.स.वरुड सदस्य सौ.अंजलीताई तुमराम, सौ.ललिताताई लांडगे, न.प.चे उपाध्यक्ष किशोर भगत, गटनेता नरेंद्र बेलसरे, नगरसेवक संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ.निशाताई पानसे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थिती होते.
         भव्य रोजगार मेळाव्याला संबोधित करतांनी समोर म्हणाले कि, मोर्शी वरुड तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत सुशिक्षित उमेदवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी श्रेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती तसेच भारतीय जनता पार्टी मोर्शी-वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, टेंभूरखेडा ता.वरुड येथे शनिवार रोजी या युवक-युवती भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपनी रेमंड लक्झरी कॉटन नांदगाव, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, पियाजो ऑटो मोबाईल बारामती, नवभारत फर्टिलायझर नागपूर, केशव कॉम्पुटर अमरावती, निशा ग्लोबल सेक्युरिटी कंपनी नागपूर, कॅलीबर ग्रुप मुंबई-गुजरात, आरव्हीएस नागपूर,फोकस रिटेल आणि कोरिअर, साहिती रिटेल मार्केटिंग नागपूर, युवा करिअर नागपूर सहित आदी कंपन्यांचा सहभाग होता. तालुक्यासह अमरावती जिल्हातील इतर शहरामधून एक हजार पेक्षा अधिक युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. यावेळी शैक्षणिक अहर्तेनुसार विविध उद्योजकाकडे उपलब्ध असलेल्या रिक्त पदानुसार या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये मुलाखती व लेखी परीक्षा घेण्यात आल्या. या मेळाव्यात स्वयंरोजगाराच्या विविध योजनाबाबत प्रा. शिवाजी कुचे, प्रा. अभय भालेराव, डॉ.नरेशचंद्र काठोळे, डॉ.वसुधाताई बोंडे, डॉ.क्रांतीताई काटोले यांच्यासह उपस्थित अतिथिंनी मार्गदर्शन केले.
  स्पर्धेच्या युगात ध्येय साध्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी बाबत व स्पर्धेत टिकण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान सुद्धा जरुरीचे आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागातील युवक – युवतींची व्यक्तिमत्व विकास कक्षा दृढ व्हावी यादुष्टीकोणातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. मंदाताई आगरकर, सौ.पुष्पाताई धकीते, योगेश चौधरी, सौ. मायाताई बासुंदे, समीर ठाकरे, बंडूभाऊ काळे, निलेश वसुले, विजय यावले, आशिष सोनारे, मारोती पवार, मनोज माहूलकर, इंद्रभूषण सोंडे, शंकरराव चौबितकर, मनोहरराव कोसे, दिनेश कोहळे, स्वप्नील आळेकर, अनिकेत राउत, राहुल चौधरी, सचिन चौधरी, मनोज मोरे, अनमोल गुल्हाने, संजय आगरकर, गजूभाऊ ढोके, मुन्नाभाऊ जयस्वाल, अमडापूरचे उपसरपंच सुनील गवई, आशिष काकडे, प्रवीण उर्फ गोलू मानकर, संदीप बर्थे, जगदीश पापडकर, शाकीब काजी, अशपाक शहा, वखार खान, मंगेश पांडे यांच्यासह मोर्शी – वरुड शहर व ग्रामीण भागातील  भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2noSh1q




from WordPress http://ift.tt/2noWQJ1
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.