यवतमाळ / विशेष प्रतिनिधी –
महाराष्ट्रातील पत्रकारांचा संरक्षण कायदा तसेच पत्रकारांसाठी पेन्शन योजना , आरोग्य योजना लवकरात लवकर आमलात आणू असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांना दिले. यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ना. पाटील यांनी आज यवतमाळजिल्ह्याला सदिच्छा भेट दिली होती. याप्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने संरक्षण कायदा , आरोग्य योजना , पेन्शन योजना अशा विविध विषयांवर चर्चा केली. हि चर्चा सकारात्मक झाली असून पाटील यांनी लवकरच त्यास मंजुरी मिळवून देऊ असे आश्वासन पत्रे यांना दिले.
याप्रंगी दैनिक यवतमाळ नगरीचे संपादक प्रवीण रापत्तीवार, सुरेंद्र वाघमारे, विनोद पवार, विनोद जवादे हे उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2mleZZh
from WordPress http://ift.tt/2nKx40e
via IFTTT
No comments:
Post a Comment