Latest News

मेडशी येथे रुग्ण कल्याण समितीत जिल्हा परिषद सदस्याची हुकूमशाही

महेन्द्र महाजन जैन  / वाशिम –

वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे जिल्हा परिषद सदस्याने हुकूमशाही चालविली असून हम कर सो कायद्या प्रमाणे तो वागत आहे .प्रत्येक कामात  आडमुठी भूमिका घेत असल्याने  अधिकाऱ्यासह सर्व सामान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्न कल्याण समितीत जिल्हा परिषद सदस्यांने मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून प्रतिष्ठा पणाला लावली . मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आदेश 659/2015नुसार 20 जानेवारी 2015 ला समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार समितीची दर तीन महिन्याला नियमित सभा होऊन कामकाज होणे अपेक्षित असताना आणि वार्षिक जमा खर्चाला  समितीची रीतसर मंजुरात घेणे गरजेचे असताना समीतीच्या मंजुरातीशिवाय जिल्हा परिषद सदस्याने लाखो रुपये निधीची स्वहितासाठी वाट लावल्याचा आरोप रुग्ण कल्याण समिती सदस्य यशवंत हिवराळे यांनी केला आहे . जिल्हा परिषद सदस्याने  जिल्हा परिषद प्रशासनाने निवड केलेली समिती मान्य नसल्याची हेकेखोर भूमिका घेत चक्क जिल्हा परिषद अध्यक्षांसह  सीईओ ,आरोग्य अधिकाऱ्यावर राजकीय दबाव  आणून निवडीलाच आव्हान दिले . जिल्हा परिषद प्रशासनाने नियमानुसार समिती गठीत केली असताना सदस्यांने लोकशाहीचा गळा घोटत
 चक्क 2 वर्षांनंतर मर्जीतील अनुसूचित जातीच्या सदस्यांची  समितीत वर्णी लावत सरशी करून दाखविली .
2 वर्षा आधी रुग्ण कल्याण समिती निवड प्रक्रियेत अनुसूचित जातीच्या प्रतिनिधी साठी पंचायत समिती सभापतीनी सुचविलेल्या सदस्यांची निवड केल्या जाते यामध्ये अनुसूचित जातीचा प्रतिनिधी म्हणून मेडशी येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी सुभाष तायडे यांचे नाव  तालुका आरोग्य अधिकार्याकडे पाठविले .पंचायत समिती सभापतींनी यशवंत हिवराळे यांच्या  नावाची शिफारस करत त्याचे नाव पाठविले. मात्र जिल्हा परिषद सदस्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर राजकीय दबाव आणत  मर्जीतील कार्यकार्याचे  नाव जिल्हा परिषद कडे पाठविले जिल्हा परिषद प्रशासनाने  सभापतींनी निवड केलेल्या यशवंत हिवराळे यांची निवड केल्याने जिल्हा परिषद सदस्याने आग पाखड करत तत्कालीन अध्यक्षांसह अधिकार्याना वेठीस धरले. समिती मान्य नसल्याचे सांगत हुकूमशाही केली .2 वर्ष रुग्ण कल्याण समिती गठीत होऊनही जिल्हा परिषद सदस्याने मर्जीतील कार्यकर्त्याची वर्णी लागत नाही तो पर्यंत समितीचा कारभार चालू देणार नसल्याचा बाल हट्ट धरल्याने दोन वर्षे समितीची सभा झालीच नाही . याबाबत  जिल्हा आरोग्य अधिकार्यानी जिल्हा परिषद सदस्यांच्या राजकीय दबावाला बळी पडत  जिल्हा परिषद सदस्याच्या मर्जीतील कार्यकार्याची  शेवटी निवड केली . अडीच वर्ष रुग्ण कल्यान समितीची सभा झाली नसल्याची बाब  मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील  यांच्या निदर्शनास येताच त्यांनी 28 फेब्रुवारीला रुग्ण कल्याण समितीची सभा घेण्याचे आदेश काढले .सभेला सर्चच पदाधिकारी सह सदस्यांना बोलविणे अनिवार्य असताना मेडशी वैद्यकीय अधिकाऱयांनी  राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा परिषद सदस्याच्या   मर्जीतील सदस्यांना सभेला बोलावून इतर सदस्यांच्या न्याय हक्कावर गदा आणली.
एकंदरीत जिल्हा परिषद प्रशासन जिल्हा परिषद सदस्यांच्या हातचे बाहुले बनले  असून  लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुर असल्याने सर्वसामान्यांच्या भावना दुखाविल्या जात आहेत. कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन जिल्हा परिषद सदस्याची हुकूमशाही  उखडून फेकावी अशी मागणी होत आहे

via Blogger http://ift.tt/2nCafhn




from WordPress http://ift.tt/2nWYHX9
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.