Latest News

पोलीस अधिक्षकांची सहाय्यक ठाणेदार, पोलीस कर्मचाऱ्यांवर एवढी मेहेरबानी कशाची ? अनेक वर्षांपासुन एकाच पोलीस स्टेशनमध्ये आहे कार्यरत

अवैध धंदेवाल्यांसोबत आहे जुने सलोख्याचे संबंध

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) शासकीय कर्मचारी कोणत्याही विभागातील असले तरी त्यांची बदली ही ठराविक काळात होतच असते. अशातच पोलीस विभागातही बदल्यांचे सत्र सुरूच राहते. मात्र शहरातील सहाय्यक ठाणेदारासह काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षांपासुन एकाच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्यांचे अवैध धंदेवाल्यांसोबत सलोख्याचे संबंध अस्यामुळे तालुक्यात अवैध धंद्यांवर लगाम लावणे शक्य होत नसल्याची चर्चा धडाक्यात सुरू आहे. असे असतांनाही या पोलीसांवर ग्रामिण पोलीस अधिक्षकांची एवढी मेहेरबानी का असा सवाल उपस्थित केला जात आहे.


          शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पोलीस विभाग सर्वोच्च स्थानावर असल्याचे समजते. सर्वांत जास्त व लवकर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. नियमानुसार जास्तीत जास्त ३ वर्षे झाली की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येते. मात्र असे काही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये बघावयास मिळत नाही आहे. शहरातील पोलीस मधील सहाय्यक ठाणेदार व अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे वरीष्ठांनी दुर्लक्ष केले आहे. अनेक वर्षांपासुन एकाच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांसोबत मधुर  संबंध बनल्यामुळे अवैध धंद्यांना लगाम लावणे अशक्य झाले आहे. वृत्तपत्रांत बातम्या आल्या की २-४ दिवस अवैध धंदे बंद केले जात असुन थातुरमातुर कारवाई करण्यात येते. व त्यानंतर सर्व ‘जैसे- थे’ होऊन जाते. शहरातुन बायपास रोडने वाहतुक पोलीसांच्या डोळ्यासमोरून अवैध रेती वाहतुक माफीयांचा धुमाकुळ सुरू असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच वरली मटका, अवैध दारूविक्री ही शहरात जोमात सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र चिरीमीरीपोटी व संबंधासाठी कुठलीही कारवाई करीत नसल्याचे समजते. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करने आवश्यक आहे. पत्रकार हल्ला प्रकरणात दिरंगाईमुळे ठाणेदारांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र या प्रकरणात ठाणेदारासह एक  सहाय्यक ठाणेदार व काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. परंतु यांच्याकडे वरीष्ठांनी दुर्लक्ष केले आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील काही कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासुन कार्यरत असल्यांतरही ग्रामिण पोलीस अधिक्षकांची यांवर  ऐवढी मेहेरबानी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता तरी पोलीस अधिक्षक याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

via Blogger http://ift.tt/2nsc5BG




from WordPress http://ift.tt/2nemVuX
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.