Latest News

नक्षलवाद्यांचा आज देशव्यापी बंद.-रस्त्यावर झाडे टाकून बॅनर लावले- सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक होती ठप्प

गडचिरोली / विशेष प्रतिनिधी /-

नक्षलवाद्यांचे समर्थक आणि देहली विद्यापिठातील प्रा. साईबाबा यांच्यासह ५ जणांना गडचिरोली न्यायालयाने नुकतीच  जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याचा नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध केला आहे. या सर्वांची तात्काळ सुटका करावी, या मागणीसाठी नक्षलवाद्यांनी आज २९ मार्च या दिवशी ‘भारत बंद’चे आयोजन केले आहे.तसेच हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २३ ते २९ मार्च या कालावधीत साम्राज्यवादी विरोध सप्ताहाचे आयोजन केले होते . याच देशव्यापी बंद च्या

परिणाम आज सकाळी सकाळी   आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला  तेथे रस्त्यावर झाडे टाकून बॅनर लावण्यात
आले होते. 




सदर पत्रकांमध्ये म्हटले  आहे की, प्रा. साईबाबा यांच्या शिक्षेविरुद्ध तीव्र आवाज उठवू. ब्राह्मणीय हिंदुत्व फॅसिसवादाच्या विरोधात व्यापक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष संयुक्त मोर्च्यात निर्माण करण्यात येणार आहे. (नक्षलींचा हिंदुद्वेष ! – संपादक) जनयुद्धाला अधिक तीव्र करून ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ला हरवणार आहोत. (देशातील गृह विभागाला आव्हान देणाऱ्यां नक्षलींचा शासन बीमोड कधी करणार ? – संपादक) जगदलपूर कारागृहात संप करणाऱ्यां २ सहस्र बंदीवानांना पुष्कळ मारहाण करणाऱ्यां पोलिसांवर कारवाई, तसेच कारागृहातील जनवादी, मानवाधिकार आंदोलनकर्ते, विस्थापनविरोधी आंदोलन आणि क्रांतिकारी आंदोलनातील कार्यकर्ते यांना ‘राजकीय कैद्याचा दर्जा’ देण्याची मागणी लावून धरली आहे. नक्षलवादी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनाही कारागृहात डांबण्याचा विरोध करून त्यांची तात्काळ सुटका करा, अशीही मागणी त्या पत्रकात नमूद केली आहे.

via Blogger http://ift.tt/2o6sH2l




from WordPress http://ift.tt/2ngvxx8
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.