श्रीक्षेत्र पैठण (जिल्हा संभाजीनगर) –
सरकारीकरण असलेल्या पंढरपूर देवस्थानमधील घोटाळ्यातील भ्रष्टाचाराची गुन्हे अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी करा, अशी एकमुखी मागणी येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभेत करण्यात आली. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील श्री गाढेश्वर मंदिराजवळील संतश्री ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान (आपेगाव) फड येथे १८ मार्च या दिवशी शेकडो वारकर्यांच्या उपस्थितीत हे महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडले.
या वेळी महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा), राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय युवा कीर्तनकार हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, ह.भ.प. दादा महाराज (फड), ह.भ.प. आर्वेकर महाराज, ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांसह वारकरी संप्रदायातील अनेक संत-महंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी केले. अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली..
* अधिवेशनात संमत करण्यात आलेले ठराव –
१. जिंतूर (जिल्हा परभणी) येथे आणि राज्यात अनेक ठिकाणी वारकर्यांवर होत असलेल्या आक्रमणांची शासनाने दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
२. पंढरपूर देवस्थानातील भ्रष्टाचारांबाबत चौकशी प्रकरण शासनाने राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडून त्याची चौकशी करावी. पंढरपूर देवस्थानातील गोशाळेची दु:स्थिती आणि संशयास्परित्या गायींच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार अधिकार्यावर कठोर कारवाई करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
३. श्री क्षेत्र पैठण, देहू, आळंदी, पंढरपूर ही वैष्णवांची तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यात यावीत.
४. पुरोगामी संघटनांकडून नाहक होत असलेल्या आरोपांच्या विरोधात वारकरी संप्रदायाने सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे ठरवले असून सनातन संस्थेसारख्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनेला त्रास देणे थांबवावे
५. हिंदूंची शासनाच्या कह्यात असणारी सर्व मंदिरे शासन मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत.
६. मद्यविक्रीच्या दुकानांना देवता, संत राष्ट्रपुरुष देण्यात येऊ नये, तसेच देवता, संत राष्ट्रपुरुष विटंबना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत.
७. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी वारकरी शिक्षण संस्था आणि वारकरी विश्वविद्यालयाची निर्मिती यासाठी शासनाचे अनुदान देण्यात यावे
via Blogger http://ift.tt/2no7sbW
from WordPress http://ift.tt/2nSdVIX
via IFTTT
No comments:
Post a Comment