Latest News

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे धरणे आंदोलन

महेन्द्र महाजन जैन / वाशीम –

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या संबंधीत विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाअंतर्गत आयटक जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 ते 21 मार्च दरम्यान दोन दिवशीय धरणे आंदोलन राबविण्यात आले.
    अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना शासकीय सेवेत कायम करा, अंणणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीचा लाभ द्या, मानधनाऐवजी वेतन द्या, एका महिन्याची उन्हाळी सुटी द्या, सुसज्ज अंगणवाडी केंद्रे बांधुन द्या, मदतनिसच्या रिक्त पदे त्वरीत भरा, एका महिन्याची आजारी रजा द्या आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटकच्या वतीने सदर धरणे आंदोलन राबविण्यात आले. धरणे आंदोलनांनतर निवासी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आयटक जिल्हा शाखेच्या महिला अध्यक्षा कॉम्रेड सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉम्रेड डिगांबर अंभोरे, कॉम्रेड मालती राठोड, पद्मा सोळंके, सिता तायडे, माधुरी पाठक, वाशीम तालुकाध्यक्ष किरण गिर्‍हे, मालेगाव तालुकाध्यक्ष शोभा नवघरे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष सुजाता तुपोने, स्वाती जाधव, अलका धामणकर, संगीता कांबळे, अनिता इंगोले, नंदा गोटे, विणा पिंपळकर, सिंधु जाधव, प्रियंका बोरकर, बेबी खंदारे, सुनिता राऊत, मिरा मुंधरे, पांडे आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनिस सहभागी झाल्या होत्या. धरणे आंदोलन मंडपाला न.प. च्या महिला सभापती सौ. कंचनताई उमेश मोहळे यांनी भेट देवून आंदोलनकर्त्याच्या मागण्या समजून घेतल्या.

via Blogger http://ift.tt/2ojQPep




from WordPress http://ift.tt/2mE0Rup
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.