चांदूर रेल्वेः
शॉट सर्किटमूळे लागलेल्या आगीत अख्ये घर जळून संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना
चांदूर रेल्वे तालुक्यातील मोगरा (धोतरा) या गावी शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. या
आगीत मोगरा येथील रंगारी कुटूंब उघड्यावर आले असुन
त्यांचे नगदी ३० हजार रूपयासह एक लाखाचे नुकसान झाले आहे.
शनिवारी सकाळी नेहमी
प्रमाणे मोगरा येथील रंगारी कुटूंबातील सौ.सुषमा राजेंद्र रंगारी ह्या कामाला गेल्या तर त्यांची
मुलगी आशा ही दहावीचा पेपर देण्यासाठी बोरी केंद्रावर गेली. अशातच त्यांच्या राहत्या घरी
शॉट सर्किट होऊन अख्ये घर जळून खाक झाले.त्यामध्ये घरकुल बांधण्यासाठी
नातेवाईकांकडून आनलेले ३० हजार रूपये जळून खाक झाले.तर घरातील अन्नधान्य व
संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. राजेंद्र रंगारी व त्यांचा १९ वर्षीय मुलगा हे
बाहेरगावी कामाला असतात. तर घरी सौ. सुषमा व त्यांची आशा मुलगी राहत होते. या
घटनेचा तलाठी धोटे यांनी पंचनामा केला. या आपत्तीमूळे उघड्यावर आलेल्या रंगारी
कुटूंबाला शासनाने त्वरीत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
via Blogger http://ift.tt/2nJZMhw
from WordPress http://ift.tt/2ns1Mh8
via IFTTT
No comments:
Post a Comment