जिल्ह्यातील नगर परिषदा, पंचायतींच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले असतील, अशा अतिक्रमणाचा शोध घेऊन ते काढण्याची मोहिम राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी नगर परिषद व पंचायतींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी सुदाम धुपे, जिल्हा प्रशासन अधिकारी जी. एस. पवार यांच्यासह सर्व नगर परिषद, पंचायतींचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित होते.
आपल्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढणे आपली जबाबदारी आहे. आपल्या क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यासोबतच झालेले अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई सर्व नगर परिषदेनी करावी. त्यासाठी सुरवातीस अतिक्रमण शोध मोहिम राबवा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. अनेक नगर परिषदांकडे स्वत:चे दुकान गाळे आहे. या दुकानगाळ्यांचा फेरलिलाव घेऊन या गाळ्यांना उत्पन्नाचे साधन बनवा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान जोरात राबविण्यात येत आहे. नगर परिषदांनी आपले क्षेत्र स्वच्छ ठेवले पाहिजे, यासाठी नियमित स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. जिल्ह्यातील दहा नगर परिषदांनी येत्या 31 मार्चपर्यंत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे 100 टक्के बांधकाम पूर्ण करावे. नगर पंचायतींनीही आपले क्षेत्र 100 पुर्ण करावे. अशा सुचनाही त्यांनी केल्या.
नगर पालिकांनी आपली वार्षिक वसुली मार्च अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे. मालमत्ता व इतर कराची वसुली केल्यास नपच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. त्यामुळे वसुलीकडे लक्ष दिल्या जावे, असे ते म्हणाले. नव्याने नगर पंचायती झालेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या समायोजनावरही बैठकीत चर्चा झाली. शासनाकडून विविध योजनेंतर्गत नगर परिषदांना देण्यात येत असलेल्या विकास निधीचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.
via Blogger http://ift.tt/2mUaSAs
from WordPress http://ift.tt/2nkNYoK
via IFTTT
No comments:
Post a Comment