Latest News

डिएसपी श्रेणीच्या पोलीस अधिकारांना सभेला पाठवा – जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते यांचे पोलीसांना स्पष्ट आदेश. जिल्हा अ‍ॅट्रासिटी समितीची आढावा सभा

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

अनुसूचित जाती-जमाती वरील अत्याचारांची त्वरीत दखल घेऊन त्यांना त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी
अ‍ॅट्रासिटी कायद्याची निर्मिती केली. मात्र या गंभीर प्रकरणाची चौकशी करून ते न्यायालयात दाखल
करण्यात पोलीस हयगय करतात. तसेच जिल्ह्याच्या अत्यंत महत्वाच्या अट्रासिटी समितीच्या सभेला
डिएसपी श्रेणीचे अधिकारी हजर न राहता पोलीस उपनिरीक्षकांना पाठवितात याबद्दल जिल्हाधिकारी यांनी
तिव्र नाराजी व्यक्त करून यापूढे अ‍ॅट्रासिटी सभेला डिएसपी श्रेणीच्या अधिकाऱ्यांना  पाठवा असे स्पष्ट निर्देश
पोलीसांना दिले.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली व अशासकिय
सदस्य अ‍ॅड.पी.एस.खडसे, प्रा.रवींद्र मेंढे, सुरेश स्वर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात
संपन्न झाली.समिती सचिव तथा समाज कल्याण सहा.आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी १ एप्रिल ते २८फेब्रुवारी
अखेर पर्यंत शहरात २६ व ग्रामीण भागात ९१ असे एकूण  ११७ अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे जिल्ह्यात झाले. त्यापैकी
९५ अनुसूचित जाती व २२ अनुसूचित जमातीचे आहेत. शहरातील १४ प्रकरणे व ग्रामीण भागातून ४७
प्रकरणे पोलीस तपासावर आहेत.१ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रवारी २०१७ या ११ महिण्यातील गुन्हाचा
आढावा घेतला असता शहरात २६ व ग्रामीण भागात ९१ गुन्हे असे एकूण  ११७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी
६१ प्रकरणे पोलीस तपासावर असुन ५३ प्रकरणे न्यायालयात दाखल तर ३ प्रकरणे पोलीस तपासात
निकाली निघाले आहेत. या कायद्याविषयी येत्या दोन महिण्यात जिल्हास्तरिय कार्यक्रम घ्यावा, गृह
विभागाने पोलीस तपासावरील प्रकरणे जलदगतीने निकाली काढावी,या समितीची बैठक पुन्हा लावुन
त्यामध्ये पोलीस विभागाने प्रकरणनिहाय आढावा घ्यावा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्याणी  सांगीतले. कटोरा गांधी येथील वानखडे
कुटूंबावर झालेल्या अत्याचारात कुटूंबातील कर्त्या  कमलाबाई वानखडे मृत्युमुखी पडल्या. त्याचे वारस
सावधान वानखडे यांना शासकिय नोकरीत सामावुन घेण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या
मार्गदर्शनानुसारजिल्हाधिकाऱ्याणी वानखडे यांना आरोग्य खात्यात वार्ड बॉयची नोकरी देण्याबाबत जिल्हा
शल्क चिकित्सक राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. तसे सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांना
डॉ.राऊत यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना सामावुन घेण्याचे सांगीतले. यावेळी पोलीस आयुक्त
कार्यालय,ग्रामीण व शहर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पिएसआय बोरकर, पाटील,पवार आणि समाज
कल्याण निरिक्षक बी.आर.राऊत उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2n4QDQ5




from WordPress http://ift.tt/2nUmkQ7
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.