Latest News

सावंगा विठोब्यात भव्य गुढीपाडवा यात्रेला सुरूवात – शिवाजी महाराजांच्या काळातील श्री.संत अवधुत महाराज. अवधुत संप्रदायाची स्थापना



चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

जाणता राजा छ.शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या समकाळात विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सावंगा विठोबा जंगलात श्री.कृष्णाजी अवधुत महाराजांनी अवधुती संप्रदायाची स्थापना केली. दोन गोट्टयावर ताल धरून अवधुती भजनाच्या माध्यमातून जीवनाचे साधं सोपे तत्वज्ञान समाजाला सांगीतले. जवळपास तिनशे वर्षापूर्वी अवधुती तत्वज्ञानाची ज्योत पेटविणारे श्री. कृष्णाजी अवधुत महाराजांची भव्य कापूराची यात्रा गुढीपाडव्या पासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याला श्री.अवधुत महाराजांच्या समाधी दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविकांची गर्दी सावंगा विठोब्यात उसळणार आहे. एक दहा-बारा वर्षाचा अनोळखी मुलगा चिरोडी गावात आला. उकंडराव  चतुरांनी त्याला सहारा दिला. गोविंद, संतु, चिंतु व पुनाजी या चार मुलांबरोबर गुरे-ढोरे चारण्याच्या कामाला लावले. चारही मुले तत्कालीन सावंगा विठोबाच्या घनदाट जंगलात
ढोरे चारत असे. सध्याचे अवधुत मंदिराच्या गाभाऱ्याच्या  ठिकाणी भोश्याचे एक झाड होते. त्या झाडाखाली अवधुत महाराज सुंदर भजन गात.त्यांना पुनाजीची साथ देत होती. अवधुत महाराज सुंदर आवाजात भजन गात.सगळे मंत्रमुग्ध होत. अवधुत महाराजाच्या गळ्यात जनु सरस्वतीचा वास होता. दोन गोट्यांवरील भजन सतत चालत राही अशी माहिती सावंगा विठोबा देवस्थानचे उपाध्यक्ष दिनकरराव मानकर यांनी परंपरेतून आलेली माहिती सर्वांना सांगत होते.श्री.अवधुत महाराजाची भजने पुनाजींना तोंडपाठ होती. त्यावेळी श्री.अवधुत महाराजांनी भजनातून समाजातील अनिष्ट जाती प्रथावर प्रखर हल्ले चढविले.
समाज जागृतीचे कार्य त्यांनी सुरू ठेवले. अत्यंत सोप्या शब्दातून लोकांचे प्रबोधन केले. त्यावेळी अवधुत मंदीराच्या ठिकाणी एक झोपडी होती. साडेतीन दिवस कोणीही झोपडीचे दार उघडू नका असे सांगत अवधुत महाराज त्या झोपडीत शिरले. परंतु भक्तांना राहवलं नाही. दोन दिवसांनतर झोपडीचे दार उघडले तर अवधुत महाराजांच्या शरीराचे पाणी झाले. अवधुत महाराजाच्या देहाचे पाणी झाले.त्या ठिकाणी समाधी बांधल्याचे संस्थान अध्यक्ष गोविंदराव राठोड यांनी सांगीतले. तेव्हा पासून येथे कापूर जाळण्याची प्रथा आहे. म्हणून सावंग्याची यात्रा कापूराची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे. कापुरामूळे वातावरण निजंतुक होते. सावंग्यात मनोरूग्णाना  दिलासा मिळतो.त्यामूळे अनेक मनोरूग्ण सावंग्यात येतात. विधीनुसार पुजा, पाच मुजरे
व मंदिराला प्रदक्षिणेमूळे अनेक मनोरूग्ण बरे झाल्याचे सचिव वामनराव रामटेके यांनी सांगीतले. अवधुत महाराजाचे शिष्य पुनाजी महाराजांनी झेंड्याची प्रथा सुरू केली. तेव्हाचे लहान झेंड्यात वाढ होऊन आज ७० फुट  उंच झाले आहे. श्री.अवधुत महाराज देवस्थानात विविध धार्मिक विधी
२७ मार्च ते ५ एप्रिल रामनववी पर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.गुढीपाडव्याला ७० फुट उंच झेंड्यांना नविन खोळ चढविण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. हभप चरणदास कांडलकर झेंड्यांना पद स्पर्श न करता नवीन खोळ चढविणार आहे. हा क्षण पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळणार आहे. २९ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत दुपारी २ वाजता हभप कारणकर महाराज यांचे अवधुती भजनावर प्रवचन आणि ४ एप्रिल ला दुपारी ४ वा. रामनवमी निमित्त चंदनउटीचा कार्यक्रम व रमना काढण्यात येणार आहे.५ एप्रिल ला सकाळी ९ वाजता चैत्र मांड व ढाल समाप्ती आणि सकाळी१० वाजता गुढीपाडवा यात्रा महोत्सवाचे समारोप होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा.रामदास तडस व प्रमुख अतिथी पालकमंत्री प्रविण पोटे व माजी आ.अरूण अडसड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सकाळी ११.३० वा.हभप कारणकर महाराजांचे काल्याचे किर्तन व दुपारी १ वा.भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी श्री कृष्ण अवधुत बुवा संस्थानचे अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, विश्वस्त दिनकर मानकर, विनायक पाटील, रूपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, अनिल बेलसरे, दिगांबर
राठोड, पुंजाराम नेमाडे, कृपासागर राऊत, स्वप्निल चौधरी सह स्वंयसेवक,गावकरी मंडळी झटत आहे.

via Blogger http://ift.tt/2oqKei6




from WordPress http://ift.tt/2o2i1lC
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.