स्थानिक नगर परीषदच्या मुख्याधिकारीपदी अखेर पुणे येथुन आलेले रविंद्र पाटील रूजु झाले आहे. कारभार सांभाळताच स्थानिक भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
अनेक महिन्यांपासुन स्थानिक नगर परीषद चा मुख्याधिकारीपदाचा प्रभार चिखलदऱ्याचे मुख़्याधिकारी सुमेध अलोणे यांच्याकडे होता. त्यामुळे आता नगर परीषदमध्ये मुख्याधिकारीपदी पुणे येथील कमीश्नर कार्यालयात कार्यरत असलेले रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी स्थानिक नगर परीषदमध्ये कारभार सांभाळताच भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता संजय मोटवानी, नगरसेवक संजय पूरसाम, नगरसेविका सौ. निलीमा शर्मा, सौ. सूरेखा तांडेकर,सौ. दीपाली मिसाळ,नगरसेवक अजय हजारे तसेच मून्ना शर्मा, विजय मिसाळ, विलास तांडेकर आदींनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. स्थानिक नगर परीषदमध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्याची चौकशी अजुनही प्रलंबितच आहे. त्यामुळे नवीन रूजु झालेले मुख्याधिकारी या प्रकरणातील दोषींवर चौकशी करून कारवाई करणार का याकडे सुध्दा अनेकांचे लक्ष लागले आहे.
via Blogger http://ift.tt/2ns1h6L
from WordPress http://ift.tt/2mMC2Z6
via IFTTT
No comments:
Post a Comment