Latest News

शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक उत्सव आणि देवतांच्या प्रतिमा यांवर अद्याप बंदीच !

मुंबई – 
वर्ष २००२ चे मूळ परिपत्रक कायम, केवळ ४ जानेवारी २०१७ चे परिपत्रक रहित

शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये धार्मिक उत्सव साजरे करण्यास बंदी घालणारे आणि देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्‍याने ४ जानेवारी या दिवशी पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष २००२ मधील मूळ परिपत्रक कायम आहे, अशी माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी दिली. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शासनाने मान्य केलेल्या राष्ट्रीय-राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या व्यतिरिक्त अन्य राजकीय नेत्यांची छायाचित्रे आणि देवतांची चित्रे लावणेही अवैध ठरणार आहे.
गुप्ता यांनी सांगितले की, वर्ष २००२ मधील या संदर्भातील विषयांच्या शासन धोरणामध्ये कोणताही पालट करण्यात आलेला नाही. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके आणि शासन निर्णयांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे मूळ परिपत्रकाचा अंमल कायम रहाणार आहे.
ही जनतेची शुद्ध धूळफेक नव्हे का ? सरकारने असे करणे, ही दुट्टप्पीपणाची भूमिका आहे ! राज्यशासनाने वर्ष २००२ चे मूळ परिपत्रकही रहित करावे आणि तसे जाहीर करावे अन्यथा मूळ परिपत्रक रहित होईपर्यंत धर्माभिमानी हिंदूंना आंदोलन चालूच ठेवावे लागेल !

via Blogger http://ift.tt/2jHL7nj




from WordPress http://ift.tt/2jI0Ouz
via IFTTT

1 comment:

  1. शासकीय कार्यालयात कोणत्याही धर्माची पूजा करण्यास अथवा फोटो लावण्यास मनाई करणे अतिशय योग्य निर्णय आहे.

    ReplyDelete

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.