जागतिक नेते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आत्ताच्या जेष्ठासह तरूण पिढीला आलेला नाही. मात्र त्यांचे नातु भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना ‘ याची देही यांची डोळा ‘ पाहण्याचे योग अमरावती जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी व बहुजन समाजाला येणार आहे.
भारतीय बौध्द महासभा, धामणगाव रेल्वे व समता सैनिक दलाच्या तालुका शाखाच्या वतीने उद्या २९ जानेवारीला सकाळी ११ ते ५ टि.एम.सी.सभागृह, कॉटन मार्केट चौक, धामणगाव रेल्वे येथे भव्य धम्म परिषद व धम्म दीक्षा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी डॉ.बाबासाहेबांचे नातु व यशवंतराव आंबेडकर यांचे पुत्र भिमराव यशवंत आंबेडकर यांचे धामणगाव शहराला पदस्पर्श होणार आहे. त्यामूळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला पाहण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून हजारो आंबेडकरी जनतेची अलोट गर्दी उसळणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष व डॉ.बाबासाहेबांचे नातु भिमराव आंबेडकर करणार असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगाव रेल्वे भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड तर स्वागताध्यक्ष म्हणून भारतीय बौध्द महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष विजय चोरपगार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, रवी भगत, रूपेश वानखडे, उषाताई खंडारे राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून नरहरी वालोंद्रे, रवींद्र मेश्राम आणि विजय जामनिक,राजेश चोरपगार, प्रभाकर मोहोड, बाळासाहेब चोरपगार, संजय खडसे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
via Blogger http://ift.tt/2jI3s0Y
from WordPress http://ift.tt/2jALAHE
via IFTTT
No comments:
Post a Comment