यवतमाळ-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते उपस्थित होते. कार्यक्रमात दोन मिनीटांचे मौन पाळण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलांनी भजन सादर केले.
via Blogger http://ift.tt/2jKBwM9
from WordPress http://ift.tt/2jvmLcP
via IFTTT
No comments:
Post a Comment