कळंबेश्वर (अकोला)–
येथील श्री मारुती संस्थानच्या सभागृहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. १६० धर्माभिमानी सभेला उपस्थित होते. समितीचे श्री. योगेश जोशी यांनी शंखनाद करून सभेला प्रारंभ केला. समितीचे श्री. धीरज राऊत आणि रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेसाठी श्री मारुती संस्थान यांनी विनामूल्य सभागृह आणि ध्वनीक्षेपण यंत्र दिले होते.
वक्त्यांचे मार्गदर्शन
स्त्रियांनो, लव्ह जिहादचा धोका ओळखून आत्मबलसंपन्न व्हा ! – सौ. माधुरी मोरे
लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात. हे थांबवण्यासाठी आत्मबलसंपन्न होऊन नारीशक्ती जागृत करायला हवी.
धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. धीरज राऊत
आज हिंदूंना धर्माचरण करण्याची लाज वाटते; मात्र संकटांच्या वेळी देवाचाच धावा केला जातो. प्रत्येक घरात एक धर्मांध शिरला असून तो दूरचित्रवाणी किंवा अन्य व्यवहार यांच्या माध्यमातून आपले घर आणि संस्कृती पोखरत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर वर्ष १९९० मध्ये काश्मिरात जे घडले, त्याची पुनरावृत्ती होईल. यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे.
via Blogger http://ift.tt/2kvAPom
from WordPress http://ift.tt/2kc6PQT
via IFTTT
No comments:
Post a Comment