Latest News

‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

नंदुरबार–
 मलकापूर येथे झालेल्या दंगली प्रकरणी धर्मांधांना सूत्रधारांसह त्वरित अटक करावी तसेच निरपराध हिंदूंवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि जे पाकप्रेमी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, त्यांनी येथून चालते व्हावे, अशी चेतावणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने आयोजित निदर्शनाच्या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नरेंद्र तांबोळी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल केवळ मुसलमानांनी केली असतांनाही निरपराध हिंदूंवरच गुन्हे प्रविष्ट केले. या प्रकरणात ‘एम्आयएम्’चे नगरसेवक शहेजाद खान यांच्यावर गुन्हा प्रविष्ट असून तेही फरार आहेत. या धर्मांधांना त्वरित अटक करून कठोर शासन करावे.

via Blogger http://ift.tt/2kbgc0u




from WordPress http://ift.tt/2j7VGMB
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.