Latest News

मंगरूळ येथील शेतकऱ्यांना अटक करून मोजणी करणाऱ्या सरकार व अधिका-यांचा जनता दलाने केला निषेध

(चांदूर रेल्वे  / शहेजाद खान ) – 

   नागपूर -मुबई  समृध्दी महामार्गासाठी जबरदस्तीने शेतक-यांच्या जमिनीचे  सर्वेक्षण करण्यास आलेल्या सर्वेक्षकांना हाकलून लावणाऱ्या नांदगाव  खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील शेतकरी  रूपरावजी शिरभाते यांना मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी अटक करून  जेलमध्ये डांबण्याच्या घटनेचा महाराष्ट्र जनता दल प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांनी निषेध केला आहे.

       नागपूर – मुबईसाठी  दोन महामार्ग आहे. मग तिसरा महामार्ग कशासाठी? त्या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांना भीकेला लावणे हा कोणता विकास आहे. त्या दोन मार्गावर अजुन सुधारणा केल्या असत्या तर हजारो शेतकरी भुमीहीन झाले नसते. जेथे  जेथे  प्रकल्पात शेतकऱ्यांच्या  जमिनी गेल्या उदा. बेंबळा प्रकल्प लोअर वर्धा प्रकल्प या शेतकऱ्यांनचे हाल काय झाले हे आपल्या डोळ्यासमोर आहेत. ते प्रकल्पग्रस्त अजूनही मूलभूत सुविधापासून वंचीत असल्याचे डॉ. पांडुरंग ढोलेंनी व्यक्त केले. अशा ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना भिकारी करून मूठभर श्रीमंतांचा विकास करणाऱ्या
शासनाचा जनता दल(से) निषेध केला आहे.

via Blogger http://ift.tt/2jpCjCo




from WordPress http://ift.tt/2jZwmMU
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.