Latest News

पल्स पोलीओ कार्यक्रमानिमित्त संत नगरीत जनजागृती रॅली संपन्न

शेगाव  /  प्रतिनिधी-समीर देशमुख –

 पल्स पोलीओ या राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त आज संत नगरीत   शेगाव   शहरातुन जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
येथील स्थानिक सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात सकाळी ८ वाजता नगराध्यक्षा सौ.शकुंतलाबाई बुच, उपाध्यक्षा सौ.वर्षाताई दिपक ढमाळ, आरोग्य सभापती सौ.मंगला कमलाकर चव्हाण, दिपक ढमाळ यांच्यासह मान्यवरांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सुरूवात करण्यात आली.  यापुर्वी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीओ या राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करून जनसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.दिलीप भुतडा, सचिव आशिष पालडीवाल, विलास घाटोळ, डॉ.अभय गोयनका, ललीत चांडक, ऍड.योगेश जयपुरीया, हितेश राय, डॅ.दिनेश अग्रवाल, पंकज अग्रवाल, अनिल भरतीया, कैलास देशमुख, राहुल पालडीवाल, सचिन गाडोदिया, राजेश शर्मा, निखील खेतान, भारत पालडीवाल, अशोक उन्हाळे, अभिषेक अग्रवाल, आशिष दिवानका, धिरज टिबडेवाल, कुणाल काशेलानी, मयुर वर्मा यांची उपस्थिती होती. रॅली गांधी चौक, आंबेडकर चौक, लहुजी वस्ताद चौक, खेतान गल्ली, जैन मंदीर, शिवनेरी चौक, आठवडी बाजार, कॉटन मार्केट, शिवाजी चौक मार्गे जावुन रॅलीचा समारोप शासकीय रूग्णालयात करण्यात आला. रॅलीमध्ये बुरूंगले हायस्कुल, म्युनिस्पल हायस्कुल, अंजुमन हायस्कुल, मुरारका विद्यालय, महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी रॅलीतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर नारे देत रॅलीची शोभा वाढविली.
रॅलीकरीता डॉ.प्रियेश शर्मा, मेट्रन ठाकरे, पीएचएन पिसे, जया चांगले, अजय देशमुख, रमेश चौधरी, कंकाळ, रमेश पाघृत, धनंजय जोशी, विजय उमरकर यांच्यासह रूग्णालयातील शेकडो कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

via Blogger http://ift.tt/2kdu1xX




from WordPress http://ift.tt/2k3dlY0
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.