Latest News

सिंहगडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी उपस्थित ७० हून अधिक जणांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
गडावर राष्ट्रध्वज प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरी पाहून अनेकांनी ‘भारतमाता की जय’ यांसह अन्य घोषणाही उत्स्फूर्तपणे दिल्या. समितीच्या कार्यकर्त्यांनी सिंहगडावरील अन्य २ ठिकाणी पथनाट्य सादर केले. त्याला अनुक्रमे ७० आणि ८० उपस्थिती होती. या वेळी क्रांतिकारकांचे प्रदर्शन, ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. प्रदर्शनाला १ सहस्राहून अधिक जणांनी भेट दिली. राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने गडावर ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. प्रबोधन फेरीमध्ये प्रा. सुनील मराठे हे जिज्ञासू आपणहून सहभागी झाले.

via Blogger http://ift.tt/2khIoSD




from WordPress http://ift.tt/2jHNeau
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.