जळगाव –
येथील महानगरपालिकेचे श्री. सुरेशदादा जैन प्राथमिक आरोग्य केंद्र पिंप्राळा येथे कार्यरत सनातन संस्थेचे साधक श्री. दिलीप पांडुरंग पोळ यांना मागील २७ वर्षांत अखंड सेवा बजावल्याविषयी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून महापौर श्री. नितीन लढ्ढा यांच्या हस्ते ‘कामगार श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम, श्री गणेशमूर्ती, श्री दुर्गादेवीमूर्ती विसर्जन येथे नेहमी प्रामाणिकपणे सेवा केल्याविषयी त्यांचे नाव अखिल भारतीय सफाई मजदूर कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाला देण्यात आले होते.
या वेळी श्री. दिलीप पोळ म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनामुळे मी ही सेवा प्रामाणिकपणे करू शकलो. मागील १७ वर्षांत माझे स्थानांतर झालेले नसून मला कधीही मेमो मिळाला नाही. त्यामुळे मला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मी गुरुचरणी अर्पित करत आहे.’’
via Blogger http://ift.tt/2kD19w4
from WordPress http://ift.tt/2kvW4Xd
via IFTTT
No comments:
Post a Comment