प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमीत्ताने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात तिन दिवसीय प्रजासत्ताक दिन महोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याअनुशंघाने स्थानीक राष्ट्रीय विद्यालय येथे तिन दिवसीय प्रजासत्ताक दिन महोत्सव संपन्न करण्यात आला त्यानिमीत्ताने २४ जानेवारी ला नगराध्यक्षा सौ सुनिता नरेंद्र फिसके यांचे हस्ते अँड.राजेंद्र ताराचंदजी श्रोती यांचे अध्यक्षतेखाली श्री माणिक देशपांडे,नरेंद्र फिसके,प्रभारी मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले,पर्यवेक्षक एस.डी.झंवर,शिक्षक प्रतिनिधी स्वाती सवाई,शिक्षकेतर प्रतिनिधी डी.एन.पारधी जेष्ठ शिक्षक एम.के.येवूल यांचे उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.वर्ग ५ ते १२ व एम.सी.व्ही.सी. विभागाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
क्रीडास्पर्धा,आनंदमेला,रांगोळी,पुष्प,विज्ञान व हस्तकला चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.२६ जानेवारी ला संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार रतनकुमारजी चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहन करून शारिरीक कवायती व बक्षीस वितरण करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष अँड राजेंद्रजी श्रोती,नरेशजी खंडेलवाल,सचिव अनिलबाबूजी चौधरी,मानीक देशपांडे,रतनजी तांबी,ओमप्रकाशजी अग्रवाल,माजी मुख्याध्यापक मोहन पाटील,बाळासाहेब देवूळकर,संगीत शिक्षक रतन तडवी व पालकवर्ग यांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले व विद्यार्थ्यांना खाऊचा वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे संचलन कैलाश बद्रटीये,महेश शेरेकर,सोमेश्वर बोरवार व संजय अग्रवाल यांनी केले प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापकांनी तर आभार पर्यवेक्षक एस.डी.झंवर यांनी केले.
via Blogger http://ift.tt/2ke4SUf
from WordPress http://ift.tt/2jg7rpp
via IFTTT
No comments:
Post a Comment