हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कटिबद्ध होण्याचा सनातन प्रभातच्या वाचकांचा निर्धार !
दैनिक सनातन प्रभातच्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचा १७ वा वर्धापनदिन सोहळा येथील रहाटणी भागातील बळीराज मंगल कार्यालय येथे २९ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता पार पडला. या वेळी उपस्थित असलेले सनातन प्रभातचे वाचक, राष्ट्राभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार केला. या वेळी ह.भ.प. श्री. भानुदास महाराज तुपे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधी प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे आदींनी उपस्थितांना संबोधित केले. वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी दैनिक सनातन प्रभातमधील विविध सदरे अन् बातम्या यांची माहिती दर्शवणारे प्रदर्शन, सनातननिर्मित सात्त्विक वस्तू आणि ग्रंथ यांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते.
via Blogger http://ift.tt/2jM3DZe
from WordPress http://ift.tt/2k7j3bq
via IFTTT
No comments:
Post a Comment