नागपूर :
प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या २० – २० सामन्यात इंग्लंडवर आज झालेल्या सामन्यात ५ धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वीस षटकांत आठ बाद 144 असं रोखलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं 19 षटकांत चार बाद 137 धावांची खेळी खेळली होती
इंग्लंडला १ ओव्हर मध्ये विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
via Blogger http://ift.tt/2khfMZ5
from WordPress http://ift.tt/2kIW59s
via IFTTT
No comments:
Post a Comment