चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
चांदुर रेल्वे तालुक्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. काही दिवसांपुर्वी चांदुरवाडी जवळील अपघातात दोघांचा मृत्यु झाला होता. या नंतर आता पुन्हा रविवारी रात्री शहरातील विरुळ चौक येथे झाडाला धडक लागल्यामुळे वडरपूरा अमरावती येथील विशाल मुदळकर वय (30) यांचा जागीच मृत्यु झाला असुन मागे बसलेले चांदूर रेल्वे येथील गोविंद मुदळकर हे जखमी झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की जखमी गोविंद मुदळकर हे चांदूर रेल्वे येथील रहिवासी आहे. त्यांचेच नातेवाईक असलेले विशाल मुदळकर हे त्यांच्याकडे काही कामानिमित्य आले होते. रात्री जेवण झाल्या नंतर काही कामा निमित्य रविवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान विशाल व गोविंद हे दोघे दुचाकी घेऊन बाहेर निघाले असता रस्त्यावर असलेला गतिरोधक लक्षात न आल्यामुळे दुचाकी वरुन नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी झाडावर आदळली. या धडकेत गाडी चालवत असलेले विशाल मुदळकर हे जगीच ठार झाले व गोविंद मुदळकर हे जखमी झाले आहे. यांच्यावर प्रथमोपचार ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे करण्यात आला. पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस करीत आहे.
via Blogger http://ift.tt/2j58Iut
from WordPress http://ift.tt/2jJcN9A
via IFTTT
No comments:
Post a Comment