मुंबई /-
मनपा , जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, आयोगाने ११ जानेवारी २०१७ रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी २९ जानेवारी २०१७ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु उमेदवारांच्या सोयीसाठी आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.
via Blogger http://ift.tt/2kB9KDs
from WordPress http://ift.tt/2ktdROC
via IFTTT
No comments:
Post a Comment