Latest News

(म्हणे) ‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले !’

समता संघर्ष समितीचा थयथयाट

कोल्हापूर – २० जानेवारीला रात्री एका वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीच्या वेळी सनातनचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्याविषयी काही विधाने केली होती. कॉ. गोविंदराव पानसरे यांच्याविषयी वक्तव्ये केल्याप्रकरणी सनातन संस्थेचेे प्रवक्ता आणि अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा ‘शहीद कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समिती’च्या वतीने निषेध करण्यात आला. (सनातनद्वेषापोटी पुरोगामी मंडळींकडून अशी आंदोलने करण्यात येत आहेत. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केलेले आरोप जर खोटे असतील, तर अशी आंदोलने करण्याऐवजी पुरोगाम्यांनी ते पुराव्यासह सिद्ध करून दाखवावेत ! – संपादक) संघर्ष समितीच्या वतीने २१ जानेवारी या दिवशी सायंकाळी येथील बिंदू चौकात हा निषेध करण्यात आला.
या वेळी दिलीप पवार म्हणाले, ‘‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, आणि एम्.एम्. कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करावी. सनातनचे साधक सारंग अकोलकर, विनय पवार यांच्या विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याने त्यांचा शोध लवकर घेणे आवश्यक आहे. (पोलिसांकडे पुरावे असल्याचा पवार यांचा जावईशोध ! – संपादक) लोकशाही आणि संविधान व्यवस्था न मानणार्‍या सनातन संस्थेची सखोल चौकशी व्हावी. (लोकशाही आणि संविधान व्यवस्था न मानल्याचे एकतरी उदाहरण पवार दाखवतील का ? सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत काय उणिवा आहेत, हे उदाहरणासह सनातन प्रभातमधून प्रसिद्ध केले जाते. एखाद्या गोष्टीतील न्यूनत्व दाखवण्याचा अधिकार सनातनला नाही आणि जातीद्वेषी अन् इतिहासद्रोही गरळओक करण्याचा अधिकार मात्र पुरोगाम्यांना आहे का ? स्वतःसाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांनी काही सांगितले, तर त्यांच्या चौकशीची मागणी, ही असहिष्णुता नव्हे का ? – संपादक)
  • (म्हणे) ‘अधिवक्ता पुनाळेकर आणि प्रवक्ता अभय वर्तक यांच्याकडून डॉ. दाभोलकर अन् कॉ. पानसरे यांचे चारित्र्यहनन !’

  • मेधा पानसरे यांचा तीळपापड

मेधा पानसरे म्हणाल्या, ‘‘गेल्या कित्येक वर्षांपासून सनातन संस्थेचे अधिवक्ता  संजीव पुनाळेकर, प्रवक्ता अभय वर्तक आणि सनातन संस्था ही कॉ. गोविंद पानसरे अन् डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चारित्र्यहनन करत आहेत. पुनाळेकर यांनी कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे आहे, तसेच सनातन पत्रिकेला पाठिंबा आणि बॉम्बस्फोटात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम पुनाळेकर करत आहेत. त्यामुळे पुरोगामी संघटना त्यांचा निषेध करत आहे. (डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सनातनचा काडीमात्र संबंध नसतांना पोलीस यंत्रणा सनातनच्या साधकांना विनाकारण त्रास देऊन त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ करत आहेत. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे सनातनच्या साधकांची सत्य बाजू वृत्तवाहिन्या अन् विविध वर्तमानपत्रांतून मांडत आहेत. असे असतांना याचा काहीही अभ्यास न करता अशी बेताल वक्तव्य करून पुरोगामी मंडळी स्वतःचे हसेच करून घेत आहेत ? – संपादक)   


साभार – दैनिक सनातन प्रभात / वृत्त्संकेत्स्थळ 

via Blogger http://ift.tt/2jLezqP




from WordPress http://ift.tt/2jSqchA
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.