– येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना विविध विषयांची निवेदने देण्यात येत आहेत. त्या पार्श्व्भूमीवर २९ जानेवारीला दुपारी १.३० वाजता येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी
श्री. राजेश क्षीरसागर यांना श्री महालक्ष्मी देवस्थानातील पवित्र मनकर्णिका कुंडावर पुरातत्व खात्याची अनुमती न घेता बांधलेले अनधिकृत शौचालय पूर्णपणे निष्कासित करून ते कुंड पूर्ववत् भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले. या वेळी हा विषय विधानसभेत मांडण्याचे आश्वाकसन श्री. क्षीरसागर यांनी दिले. निवेदन देतांना सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, शिवानंद स्वामी, शिवसेनेचे किशोर घाडगे आदी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2kJofBd
from WordPress http://ift.tt/2jkCiB3
via IFTTT
No comments:
Post a Comment