Latest News

फीनले मीलच्या छतावरून पडून कर्मचारी जखमी – छताची पत्रे कमजोर, सुरक्षा व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

अचलपूर / प्रमोद नैकेले /-

अचलपूर येथील आधुनिक कापड मील फीनले नेहमीच चर्चेत राहतो.या मील मध्ये कर्मचारी वर्गावर अनेक प्रकारची संकटे नेहमीच उदभवतात केंव्हा पगारवाढ रोखल्या जाते तर केंव्हा आरोग्य सुविधा मुळे कर्मचारी वंचित असल्याने व्यवस्थापन व कर्मचारी यांचे वाद निर्माण होत असतात.
   रविवार सांयकाळच्या ६ वाजताचे सुमारास इंजिनिअरींग विभागाचे छतावर काही काम करण्यास गेलेला मुलगा विजय शिवशंकर हरडे छताचे सिमेंटची पत्रे जे कमजोर झालेले आहेत त्यावरून कोसळला व गंभीर जखमी झाला.सुरक्षा व्यवस्थापक मनीयारसाहेब सुरक्षिततेची मुळीच काळजी घेत नाही. विजय हा छतावर कशाकरीता गेला होता व त्याला कुणी छतावर कामाला पाठवले याचे कारण अद्याप समजले नाही परंतू मनियारसाहेब कर्मचारी वर्गाचे सुरक्षा व आरोग्याची काळजी घेत नाही अशी तक्रार येथे नेहमीच होत राहते. विजय हरडे हा २५ फूट उंचीवरून खाली कोसळला व सरळ इंजिनिअरींग विभागात पडला इतर कर्मचा-यांनी त्याला स्थानीक डाँ.बरडीया यांचे दवाखान्यात घेऊन गेले मात्र त्यांनी उपचार तर सोडाच साधे तपासणी करून प्राथमिक उपचार सुध्दा केला नाही उलट कर्मचारी व जखमी कर्मचारी यांना हाकलून दिले.डाँ.बरडीया यांनामील व्यवस्थापनाने कर्मचा-यांचे आरोग्य व आकस्मिक उपचाराकरीता नेमलेले आहे ते नियमित मील प्रशासनाकडून या कामाचे मानधन सुध्दा घेतात मात्र असा प्रसंग ओढवल्यास त्यांची अशी वागणूक मिळते असे येथील कर्मचा-यांनी सांगितले तसेच याबाबत कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष सुध्दा दिसून आला.अखेर जखमी विजयला मीलच्या रूग्नवाहीकेने अमरावती येथील डाँ.सावदेकर यांचे कडे दाखल केले अचलपूरला वेळेवर उपचार न मिळाल्याने विजय सध्या बेशुध्दावस्थेत आहे.मीलचे व्यवस्थापक ह्यांनी अमरावती येथे दवाखान्यात जाऊन त्याच्या उपचार करण्यासाठी डाँ.सावदेकर यांची भेट घेऊन चोकशी केली.याप्रसंगी संतप्त कर्मचारी वर्गाने जर विजयला काही झाले तर याचे दुरगामी परिणाम होतील तसेच डाँ.बरडीया यांचे अशा वागणूकीमुळे त्यांना मील प्रशासनाने मीलतर्फे कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले तसेच कर्मचारी वर्गाच्या उपचारासाठी मानधन दिले तर तिव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला

via Blogger http://ift.tt/2klwKGx




from WordPress http://ift.tt/2jr1Fgz
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.