Latest News

बेंडोजी महाराज संजीवन समाधी महोत्सवाला उत्साहात सुरवात – कलश स्थापना ,होमहवनाणे परिसर झाला भक्तिमय


शहेजाद खान / चांदूर
रेल्वे /–

लाखो  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्रेष्ठ
बेंडोजी महाराज यात्रा महोत्सवला आज घुइखेड ला मोठ्या उत्साहात सुरवात झाली 
त्यावेळेस पूर्ण परिसर
भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर न्हावून निघाला होता.
दरवर्षी प्रमाणे
याहीवर्षी संजीवन समाधी  महोत्सवाच्या
सुरवातीला कलश स्थापना केल्या गेली व बेंडोजी महाराज समाधीवरील मुकुटाचा लघुरुद्र
अभिषेक करण्यात आला सोबतच होम हवन पूजा सुद्धा करण्यात आली  संस्थानचे अध्यक्ष श्री वसंतराव घुईखेडकर यांचा
हस्ते श्रीचा पादुका व मुखवट्याचा अभिषेक करण्यात आला व आजपासूनच त्या ठिकाणी सात
दिवस भागवत कथेचे आयोजनाला सुरवात झाली .
अनेक वर्षांपासून येथे
दरवर्षी संत श्रेष्ठ बेंडोजी महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात
येतो  उद्या शनिवारी सकाळी कलश स्थापना
अभिषेक श्री वसंतराव घुईखेडकर यांचा हस्ते होणार असून दररोज सात दिवस हभप
गोदावरीबाई बंड  यांचा सुमधुर वाणीतून भागवत
कथेला सुरवात झाली . तर दररोज सकाळी  काकड
आरती , रामधून , सामुदायिक प्राथना , सोबतच सायंकाळी हरिकीर्तन होणार आहे.
त्यामध्ये ह.भ.प  नामदेव महाराज , ह.भ.प मोहोड महाराज , ह.भ.प
दिलीप महाराज काकडे , ह.भ.प पडोळे महाराज , ह.भ.प विजय महाराज गव्हाणे , ह.भ.प
योगेश महाराज यावले  यांचे हरिकीर्तन होणार
असून ह.भ.प उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच घुईखेड ,
जावरा , पळसखेड , निमगव्हाण , पिंपळखुटा येथिल महिला भजनी मंडळाचा वतीने दुपारी
भजन आयोजित करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारीला गोपाल काला, दिंडी महोत्सव , दहीहंडी
व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थांचे सदस्य श्री प्रवीण
घुईखेडकर यांनी दिली आहे. मागील २ वर्षांपासून तळेगाव येथील शंकर पटावर बंदी
आणल्या मुले याठिकाणी भरणारा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला त्यामुळे यावर्षी
दरवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात घुईखेड येथे यात्रा भरली जाईल अशी चर्चा जनमानसात
आहे.
 

दिंडीची परंपरा कायम

घुईखेड ते पैठण व तद्नंतर पुणे ते आळंदी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी
सोहळ्या सोबत पंढरपूर असा एकूण ४८ दिवसांचा प्रवास या वारीतून होतो. वऱ्हाड
प्रांतातील ही एकमेव वारी अनेक वर्षांपासून जात आहे सध्या या दिंडीचा मान माउलींचा
पालखी सोबत विठ्ठल मंदिरात समोरून प्रवेश करणाऱ्या २१ मानाचा दिंड्या न मध्ये  १७ वा क्रमांक आहे व अजूनही hi परंपरा कायम आहे 

via Blogger http://ift.tt/2kEwDlw




from WordPress http://ift.tt/2jIcKKk
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.