राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात धार्मिक फोटो म्हणजेच देवी देवतांचे फोटो काढण्याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारने नुकतेच काढले. या निर्णयाला काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने आज अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. शिवसेनेने ही यावर मोठा आक्षेप घेतला आम्हाला विचारून हा निर्णय घेतला का असा सवाल सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर सभेत केला .
राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमधील असणारे धार्मिक फोटो सन्मानाने बाहेर काढा, असे परिपत्रक राज्य सरकारकडून नुकतेच जारी करण्यात आले होते. या निर्णयाला सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
via Blogger http://ift.tt/2jx6Aip
from WordPress http://ift.tt/2kb7Lpb
via IFTTT
No comments:
Post a Comment