Latest News

॥आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी सगळा सांगावी विनंती माझी



काही कथांमध्ये श्री संत तुकाराम महाराजांचे चार वेळा स्वर्गारोहण झाल्याचे सांगितले जाते. याप्रमाणे महाराजांचे प्रथम स्वर्गारोहण झाल्यावर ते संताजी जगदाळे या वारक-यास टाळ दिंडी देण्यासाठी पुन्हा भूतलावर आले होते. यानंतर दुस-या स्वर्गारोहणात बारा अभंग लिहण्यासाठी पुन्हा भूतलावर आले. तिसरे स्वर्गारोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराय आणि कान्होबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहूत अवतरले. कान्होबारायांनी देवाबरोबर भांडण करत असताना महाराजांना परत आणा नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही अशा शब्दात धमकीच दिली होती.
। धिंद धिंद तुझ्या करीन चिंधडय़ा।
। दे माझ्या भावा आणोनिया।
यानंतर महाराजांचे चौथ्यांदा प्रयाण झाले. चौथ्या प्रयाणानंतर ते भागीरथीसाठी पुन्हा देहूगावी आले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गारोहण होते. चौथ्या प्रयाणाच्या वेळी महाराज लोकांना सांगत जात होते. बाबांनो मी चाललोय, कृपा असू द्या तुमची. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा.. शेवटच्या कीर्तनाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला महाराजांचे स्वर्गारोहण झाले. दुपारी १२ वाजता महाराज वैकुंठाला गेले. ही वार्ता भागीरथीला कळाली यानंतर तिने तुकाराम नामाचा जप केला म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते.
। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी।
सकळां सांगावी विनंती माझी।
महाराज वारक-यांना संबोधतात की, आता तुम्ही पंढरीरायाला बोलवा
। तुम्ही सनकादिक संत। म्हणविता कृपावंत।
। एवढा करा उपकार। सांगा देवा नमस्कार।
। भाकावी करूणा। विनवा पंढरीचा राणा।
महाराजांच्या नावाने यमाचाही थरकाप उडतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्याचा गजर केला पाहिजे. । तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम।💐💐💐💐💐💐💐
श्री संत तुकाराम महाराज बीजेच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌺🙏🏻कृष्ण हरी🙏🏻

via Blogger http://ift.tt/2nnOn6W




from WordPress http://ift.tt/2mlytt2
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.