Latest News

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन तातडीने द्या – शिवसेने तर्फे म.न.पा. आयुक्त यांना निवेदन

अमरावती- विशेष प्रतिनिधी –
मनपा आयुक्त श्री हेमंत पवार यांचाशी चर्चा करताना श्री आशीष ठाकरे 

 नुकताच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिका निवडणूक 2017 पार पडून त्याचे निर्णय सुद्धा लागून निवडून आलेल्या उमेदवारांनी आपापले पदभार सुद्धा स्वीकारले आहेत.म्हणजेच निवडणूक पार पडून भरपूर दिवस लोटले परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्वतःच्या खांद्यावर घेऊन चोख रितीने मोठ्या जिकरीने दिवसरात्र डोळ्यात तेल घालून कोणतीही अप्रिय घटना होऊ न देता पार पाडली,अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांचे निवडणुकीचे मानधन अद्यापपर्यंत सुद्धा देण्यात आलेले नाही,यावरून निवडणूक आयोग किती तत्पर आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे.अश्या या निवडणूक आयोगाचा करावा तेव्हडा निषेध कमीच आहे. एकटा अमरावती जिल्ह्याचा विचार करता हजारो स्त्री,पुरुष कर्मचारी अतिदुर्गम भागात जाऊन आपली सेवा देत या प्रक्रियेत सामील झाले होते.पूर्वी निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला निवडणूक आटोपल्या बरोबर मातपेट्या सील केल्यावर रोख रकमेच्या स्वरूपात त्यांचे मानधन अदा केले जात होते.पण या 2017 च्या निवडणुकीत मा.मोदीजींच्या कॅश लेस चा फटका या हजारो कर्मचाऱ्यांवर बसला कि काय असा प्रश्न माझ्या  या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला असावा..! अतिशय तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा देणाऱ्या या शा. कर्मचाऱ्यांना एकीकडे पारदर्शकतेचा नारा लावणारे सत्ताधिकारी मानधन वेळेत न देता कोणती पारदर्शकता निर्माण करत आहे हे देवच जाणे, अतिशय जोखमीचे हे निवडणूक कर्तव्य असून यात कोणत्याही चुकीला माफी तर नाहीच पण सरळ निलंबन मात्र लगेच करण्यात येते.तेव्हा अशा या निवडणुकीच्या कामाचा मोबदला कर्मचाऱ्यांना तातडीने मिळणे गरजेचे असताना सुद्धा विलंब करून त्यांचा रोष सरकार व निवडणूक आयोग आपल्या पदरी पाडून घेत आहे व एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच करत आहे,पण शिवसेना या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असून त्यांना त्यांचे मानधन तातडीने देण्यात यावे अन्यथा नाईलाजाने कर्मचाऱ्यांच्या या लढ्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन श्री आशिष ठाकरे ( शिवसेना उपशहरप्रमुख ) यांचा उपस्थितीत माननीय मनपा आयुक्त श्री हेमंत पवार यांना देण्यात आले आहे  

via Blogger http://ift.tt/2mBNjfI




from WordPress http://ift.tt/2nfpxcC
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.