बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दि 11 मार्चला कडक पोलीस बंदोबस्तात मोठी होळी पेटविण्यात येऊन यात्रा महोत्सव आणि संदलची जय्यत तयारी सुरु झाली आहे. 17 मार्च ला वाजत गाजत पिंपळगाव सराई येथून उंटावर भव्य संदल सैलानी बाबा दर्ग्यावर नेला जातो .या संदल ला फार महत्व असल्याने सर्व धर्माचे भाविक भक्त देशाच्या काण्याकोपर्यातून होळी पासून येथे डेरे दाखल होत आहेत.सैलानी बाबा दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात बोकड बळी देण्याची प्रथा आहे याठिकाणी अंगातील भुते पळत असल्याचा समाज असल्याने हातापायात बेड्या असलेले हजारो मनोरुग्ण आबाला वृद्ध बालबालिका झुलताना दिसतात. सैलानी बाबा दर्गा राष्टीय एकात्मतेचे प्रतीक आहे सैलानी यात्रा निमित्त विविध जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य महा मंडळाच्या जादा गाड्या सोडण्यात येतात .लाखो भाविक भक्त याठिकाणी एकाच गर्दी करतात येघे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो मात्र याठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता ठेवण्याचे काम प्रशासन करत नाही
त्यामुळे सैलानी बाबा यात्रा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे
via Blogger http://ift.tt/2mS2XG1
from WordPress http://ift.tt/2miTWSs
via IFTTT
No comments:
Post a Comment