Latest News

उद्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

 वाशिम / महेंद्र महाजन जैन 

वाशिम-

सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग, व्यापार व व्यवसाय उभारणीसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रसार, प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून  प्रत्येक तालुकास्तरावर प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत मंगळवार दि. २१ मार्च २०१७ रोजी सकाळी ११ वाजता रिसोडमधील गुजरी चौक येथील नगरपरिषद प्राथमिक शाळेमध्ये तालुकास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अग्रणी बँक व तहसीलदार कार्यालयांच्यावतीने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
बुधवार दि. २२ मार्च २०१७ रोजी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसर, गुरुवार दि. २३ मार्च २०१७ रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसर, शुक्रवार दि. २४ मार्च २०१७ रोजी मंगरूळपीर, सोमवार दि. २७ मार्च २०१७ रोजी मानोरा तहसीलदार कार्यालय परिसर येथे तालुकास्तरीय व दि. २९ मार्च २०१७ रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा होणार आहे. या मेळाव्यांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्जाचे अर्ज स्वीकारतील.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघु व्यवसाय व उद्योगांना मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करण्यात येते. वैयक्तिक व्यावसयिक, खाजगी व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी यासारख्या विविध व्यवसायांना मुद्रा योजनेतून कर्जाचा लाभ मिळू शकतो. मात्र अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे. वैयक्तिक व्यवसायासाठी कर्ज मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला सबंधित व्यवसायाचे कौशल्य, ज्ञान, अनुभव असणे आवश्यक आहे. नवीन उद्योग सुरु करणे अथवा सुरु असलेला उद्योग वाढविणे, व्यावसायिक गरजा पूर्ण करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यकतेनुसार मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेत असताना कोणत्याही प्रकारच्या जामिनाची व मोर्गेज ठेवण्याची आवश्यकता नाही. या योजनेंतर्गत अर्ज करताना ओळखीचा पुरावा, रहिवासी दाखला, जो व्यवसाय करत आहात किंवा करणार आहात त्याचा परवाना व स्थायी पत्ता, व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्रीचे कोटेशन, ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला आहे त्याचे पूर्ण नाव व पत्ता, अर्जदाराचे दोन फोटोसह इतर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या योजनेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच या योजनेंतर्ग कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी आपल्या तालुकास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यात सहभागी व्हावे, असे जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
विविध बँकांचा मुद्रा कर्ज मेळाव्यात असणार सहभाग
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यामध्ये प्रत्येक तालुकास्तरावर विविध बँका सहभागी होणार आहेत. याठिकाणी सदर बँकांचे स्टॉल उभारण्यात येणार असून या स्टॉलवर प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच या योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी आलेले अर्ज स्वीकारले जातील.

via Blogger http://ift.tt/2nKsX3Z




from WordPress http://ift.tt/2neau28
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.