वाशिम
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत उघडयावरील हागणदारी बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने गुड मॉर्निंग पथकाच्या वतीने प्रभावी जनजागृती मोहिम राबविली. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी (दि 19) भल्या पहाटे स्वच्छ भारत मिशनचे स्वच्छागृही रिसोड तालुक्यातील 15 गावामध्ये धडकले. या मोहिमेंतर्गत सकाळी 5 वाजता गावा गावातील हागणदारीत जाऊन लोकांची धरपकड करण्यात आली. काहींना दंड आकारण्यात आला तर काहींना उठाबशाची शिक्षा देण्यात आली. गावाच्या मुख्य रस्त्यावरील हागणदारीला आळा बसावा म्हणुन नेहमीसाठी गावातील कर्मचारी युवकांचे गुड मार्निंग पथक तौनात करण्यात आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह जिल्हा चमुचे कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, गटविकास अधिकारी मकासरे, सहायक गटविकास अधिकारी मोहन श्रृंगारे, यांच्या नेतृत्वात गावातील सर्व वस्त्यांमध्ये जाऊन टमरेल (शौचास नेण्याचे डब्बे) जप्त करण्यात आले. शौचालय असुन वापर न करणाज्यांची यावेळी चांगलीच कान उघडणी करण्यात आली. पथकासोबत उध्दटपणे वागुन सरकारी कामात अडथळा आनणाज्या 9 लोकांविरुध्द गटविकास अधिकारी मकासरे यांच्या मार्फत रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. जिल्हा कक्षाचे सल्लागार आणि तालुका समन्वयकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
via Blogger http://ift.tt/2ncvQww
from WordPress http://ift.tt/2nAX28W
via IFTTT
No comments:
Post a Comment