Latest News

ट्रक-बोलेरोच्या धडकेत एक जागीच ठार – मोगरा(धोतरा) गावाजवळ घडला अपघात



चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

ट्रक व बोलेरा पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत बोलेरो चालक जागीच ठार
झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस हायवेवर घुईखेड
जवळील मोगरा(धोतरा) गावाजवळ घडली.
अहमदनगर येथून रिलायन्स कंपनीचे  मशिन घेऊन नागपूर जात असलेले बोलेरो
पिकअप(एमएच१६-एवाय-३२३८)ला विरूध्द दिशेने येत असलेले ट्रक(एमएच३१/सीक्यू
२८२७)ने जोरदार धडक दिली.यामध्ये परविन बबनराव पवार(वय२३) रा.भोसले
आखाड्याजवळ, अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचे समोरील एक्सल
तुटल्यामूळे हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर ट्रक चालक व वाहक यांनी
घटनास्थळावरून ट्रक सोडून पळ काढला. या प्रकरणाचा तपास तळेगाव पोलीस स्टेशनचे
पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण हनोते करीत आहे.

via Blogger http://ift.tt/2mhv2Yj




from WordPress http://ift.tt/2nAxDws
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.