Latest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये महानुभाव अध्यासन केंद्राद्वारे समारोपीय प्रबोधन व्याख्यानमाला संपन्न


अमरावती.:-
     स्थानिक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातंर्गत महानुभाव अध्यासन केंद्राव्दारे मासिक प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन गेल्या वर्षभरात विद्यापीठ तसेच अनेक महाविद्यालयांकडून  करण्यात आलेले होते.  या मासिक प्रबोधन व्याख्यानमालेतील तीन दिवसीय समारोपीय व्याख्यानमाला नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधील एम.बी.ए. विभागाच्या सभागृहामध्ये संपन्न झाली.  या समारोपीय व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथील प्रसिध्द कवी, लेखक व साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव यांनी गुंफले.  त्यांनी  ‘लीळाचरित्रातून अभिव्यक्त होणारी कृषी-संस्कृती’ या विषयावर आपले विस्तृत विवेचन केले.  प्रा. भालेराव यांनी गोविंद प्रभू चरित्र्यातील कृषी संस्कृतीचे वेगवेगळे दाखले सांगितले, तसेच महानुभाव पंथाचा आद्यमराठी ग्रंथ, लीळाचरित्रातून अभिव्यक्त होणारी कृषीसंस्कृती याबाबत त्यांनी अनेक लीळा सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  प्रा. भालेराव यांनी वेद, जैन, बौध्द, ज्ञाने·ारी, तुकारामाचे अभंग अशा अनेक धार्मिक तत्वज्ञानाशी निगडीत कृषीसंस्कृतीची सुध्दा अभ्यासपूर्ण माहिती दिली. 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लीळाचरित्रातून अभिव्यक्त होणारी कृषीसंस्कृतीच जगमान्य कृषीसंस्कृती असल्याचे मत प्रतिपादित केले.  तसेच महानुभाव अध्यासन केंद्र वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करुन पंथीय तत्वज्ञान विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचवतात म्हणून त्यांचे अभिनंदन सुध्दा यावेळी त्यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानुभाव अध्यासन प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले.
    व्याख्यानमालेचे व्दितीयपुष्प विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. गणेश मालटे यांच्या अध्यक्षतेखाली मंचर, पुणे येथील सु्प्रसिध्द कवी, लेखक व साहित्यिक प्रा. संतोष पवार यांनी गुंफले.  त्यांनी  ‘श्रीचक्रधर निरुपीत कथाकव्य’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन मांडले.  प्रा. पवार यांनी लीळाचरित्रातील तसेच स्मृतीस्थळामधील सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या भक्त परिवारास सांगितलेल्या अनेक कथा व त्या कथा सांगण्यामागील स्वामींचा हेतू अतिशय सोप्या शब्दातून व्यक्त केला. स्वामींनी सांगितलेल्या कथा ह्रा केवळ कथा नसून त्यामध्ये समग्र, ब्राम्हविद्याशास्त्र इ. बाबतीत सुध्दा शिष्यांना निरुपण केल्याचे दिसून येते, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
     व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. गणेश मालटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी निरुपीलेल्या कथा किती अर्थपूर्ण होत्या, तसेच त्यांच्या कथांच्या माध्यमातून मराठी वाड्मयाला कथेचे विविध प्रकार समजून आले अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानुभाव अध्यासनाचे प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले तर कार्यक्रमाचे शिस्तबध्द आणि सुंदर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप जुनघरे यांनी केले.
    तृतीयपुष्प वाड्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मनोज तायडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. मा.रा. लामखडे (संगमनेर) यांनी लीळाचरित्रातील सामाजिकता या विषयावर आपले विचार व्यक्त केले.  आपला विषय प्रतिपादित करताना प्रा. लामखडे यांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय स्थितीबाबत विस्तृत विचार व्यक्त केले.  साहित्याच्या अनुषंगाने लीळाचरित्राचे आद्यत्व आणि त्याच्या वापक वाड्मयीन गुणांची चर्चा केली.
    यावेळी या कार्यक्रमाला अमरावती शहरातील प्रसिध्द साहित्यीक, महानुभाव तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक श्री. पुरुषोत्तम नागपुरे उर्फ पुरुषोत्तमदादा कारंजेकर, श्रीमती विद्यालक्ष्मी मेटकर, अमरावती शहरातील नामांकित साहित्यीक, महानुभाव अभ्यासक, उपासक, विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.     

via Blogger http://ift.tt/2nuQyGe




from WordPress http://ift.tt/2o6W0SF
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.