Latest News

नगर सेवक चंदू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव येथे ठीक ठिकाणी ८० लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आहे  

जिल्हा प्रतिनिधी :-वाशिम महेंद्र महाजन 

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव
 नगर पंचायत चे  नगर सेवक तथा जी.प सदस्य चंदू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुचविलेल्या सुमारे ८० लाख रूपयाचे विकास कामांचे भूमिपूजन रविवारी १९ मार्च रोजी मालेगाव येथे झाले.मालेगाव शहरामध्ये स्वखर्चाने टंकरच्यामाध्यमातून मोफत पाणी पुरवठा करतात त्यामुळे त्यांनी गावकर्‍यांनी जळदूत ही उपाधी बहाल केली आहे.ते मालेगाव चे जी.प.सदस्य असताना सुमारे दीड वर्षाआधी त्यांनी मालेगाव शहारच्या विकाससाठी प्रचंड मेहनत घेवून सुमारे ८० लाख रूपयाची कामे सुचवली होती.तसेच प्रत्यक्ष कामांना देखील सुरुवात झाली असून त्या बांधकामाचे मटेरियल सुध्या येऊन पडल्याची माहिती चंदू जाधव यांनी दिली.सुमारे ८० लाख रुपयाची विकास कामे मालेगाव शहरात आणून त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्यामुळे मालेगाव शहरवासीयातर्फे चंदू जाधव यांचं कौतुक होत आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नगर पंचायतच्या महिला व बालकल्याण सभापति सौ.सरला चंदू जाधव,न.प.सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख संतोष जोशी,न.प.सदस्य सौ.सुषमा सोनुने,सौ.कविता राऊत,संतोष सुरडकर,किशोर महाकाळ,गजानन सारसकर,या न.प.सदस्याची प्रमुख उपस्थिती होती.तसेच मनोज काळबांडे,आशिष डहाळे,देवा राऊत,नागेश बळी,गोविंद अहिर,दिलीप गठ्ठाणी व मित्रमंडळ उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2nK1DmC




from WordPress http://ift.tt/2nseb4C
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.