वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोराळा जहागीर येथील ग्रामसेवकाने सहस्त्र विहिरीच्या तांत्रिक मान्यतासह वर्क ऑर्डरसाठी 2000 हजार रुपये लाचेची मागणी केल्यावरून ए सीबी ने ग्रामसेवक भगवान सखाराम भिसडे यांना 25 मार्चला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोराळा येथील एका शेतकऱ्याच्या पत्नीने 20 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भगवान सखाराम भिसडे वय 56 वर्ष ग्रामसेवक बोराळा जहागीर ता मालेगाव जिल्हा वाशिम यांनी पतीला सहस्त्र मंजूर विहिरींच्या तांत्रिक मान्यतेसह वर्क ऑर्डर काढण्यासाठी 18 मार्च ला भ्रमण ध्वनीद्वारे 2000 रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाच लुचपात प्रतिबंधक विभागाकडे केली 24 मार्चला अधिकाऱयांनी पंचासमक्ष बोराळा येथे जाऊन पडताळणी केली असता त्यावेळी 25 मार्चला बोराळा येथील गजानन जटाळे यांच्या घरी 2000 रुपये लाच देण्याचे ठरले 25 मार्चला भगवान भिसडे यांना लाच स्वीकारताना लुचपात प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आलोसे विरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये कलम7,12,13, (1)सह कलाम 13(1) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये कार्यवाही करण्यात आली
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश चिमटे,अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती नाशिकर, पोलीस उपधिक्ष व्ही गांगुर्डे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक ए जी रुईकर,पोलीस जमादार भगवान गावंडे,विनोद सुर्वे सुनील पुंडे आदींनी केली
via Blogger http://ift.tt/2mCjrmP
from WordPress http://ift.tt/2ohwbeX
via IFTTT
No comments:
Post a Comment