वाशीम – भीमा कोरेगाव मुक्ती संग्राम व्दिशताब्दी शौर्य वर्षानिमित्त पाचशे बहुजन शुरवीरांना अभिवादन करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवार, 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शहरातून मोटरबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅलीत दोनशेच्यावर मोटरबाईकस्वार सहभागी होत असून रॅलीची सुरुवात स्थानिक लाखाळा येथील आरटीओ कार्यालय परिसरातील मैदानातुन होईल. रॅलीदरम्यान बहूजन महापुरुषांना अभिवादन केल्या जाईल. ज्या वीर महापुरुषांनी भीमा कोरेगाव येथे जुल्मी पेशवाईविरुध्द बारा तासाच्या वर अखंडपणे लढून पेशवाईचा अंत केला व विरविजय पताका ङ्गडकावली अशा शुरविरांना मानवंदना व अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील सर्व बहूजन स्वाभिमानी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बहूजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक डॉ. रवी जाधव यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2nmnjav
from WordPress http://ift.tt/2nAIqq8
via IFTTT
No comments:
Post a Comment