डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या 50 हजार चौरस फुट आकाराच्या आणि आकर्षक व सुंदर अशा कॅनोपीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. आकर्षक कॅनोपीमुळे विमानतळाला स्मार्ट लूक मिळाला असून आगमन व प्रस्थानासाठी प्रवाशांना सुलभपणे विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये जाणे सुलभ झाले आहे.
मिहान इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आयोजित कॅनोपीच्या उद्घाटन सोहळयास केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खासदार विकास महात्मे, सर्वश्री आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ. आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मल्लिकार्जुन रेड्डी, महापौर नंदाताई जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मिहानचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कॅनोपीचे उद्घाटन केले. प्रवाशांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक कॅनोपी तयार करण्याबद्दल मिहान इंडियाचे त्यांनी कौतूक केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरील प्रवाशांच्या सुविधामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने आकर्षक व सुंदर कॅनोपी बांधण्यात आली असून यासाठी पॉलीकार्बोनेट शीटचा वापर केल्यामुळे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे. कॅनोपी तयार केल्यामुळे विमानतळाच्या मुख्य इमारतीमधून वाहनतळापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना सुविधा होणार आहे. प्रवाशासोबतच सोबत येणाऱ्या नातेवाईकांना येथे थांबण्याची व बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून या परिसरात कॅफेटेरिया तसेच आवश्यक साहित्य खरेदीची व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न आहे.
यावेळी मिहानचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री चहांदे, श्री.मुळेकर, अबीद रुही, सुरज शिंदे, राहूल लाबेर, पी.के. सायरे आदी अधिकारी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2nkltF4
from WordPress http://ift.tt/2nC8cK9
via IFTTT
No comments:
Post a Comment